शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : कडक निर्बंधात आढळले ३६४९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:18 IST

Corona Cases in Washim: कडक निर्बंधादरम्यान तब्बल ३६४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधादरम्यान तब्बल ३६४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कडक निर्बंधापूर्वीच्या आठ दिवसांत ३७१७ रुग्ण आढळून आले होते.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ ते १५ मे या दरम्यान कडक निर्बंध लागू केले होते. मेडिकल, दवाखाने, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा होती. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या ही पूर्वीच्या तुलनेत बऱ्याच अंशी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना कडक निर्बंधाच्या कालावधीत रुग्णसंख्येत फारशी घट आली नसल्याचे दिसून येते. कडक निर्बंध लागू होण्यापूर्वीच्या आठ दिवसात अर्थात १ ते ८ मे या दरम्यान ३७१७ रुग्ण आढळून आले होते तसेच उपचारादरम्यान ३५ जणांचा मृत्यू झाला. कडक निर्बंध लागू झाल्याच्या आठ दिवसात ३६४९ रुग्ण आढळून आले तर उपचारादरम्यान ३७ जणांचा मृत्यू झाला. कडक निर्बंधादरम्यान रुग्णसंख्या कायम असल्याने मागील कारणीमिमांसा करणे, सूक्ष्म नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह व इतर फारशा सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी दिली जात असल्याने त्या कुटुंबातील इतर सदस्यही बाधित होत असल्याचे दिसून येते. याकडे प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या