रिसोड (जि. वाशिम): माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २0१५ सुरू असून, इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी केंद्रावर गैरप्रकार आढळल्याप्रकरणी कोयाळी येथील केंद्रसंचालक व उ पसंचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना ७ मार्चला रात्री ९.५0 वाजताच्या दरम्यान घडली माध्यमिक शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्या तक्रारीवरून परीक्षा केंद्र कोयाळी येथील शिवाजी विद्यालयामध्ये दहावीची परीक्षा सुरू असताना अनियमितता, गैरजबाबदारपणा, कर्तव्यात कसूर करून कॉपी करणार्या गंभीर प्रकारास प्रोत्साहन दिले. तसेच वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले नसल्या प्रकरणी केंद्र संचालक पी.बी. पडघान व उपकेंद्र संचालक एस.एस. वाघ यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रीव्हिशन ऑफ माल प्रॅक्टिसेसस अँक्ट, युनिव्हर्सिटी बोर्ड अँन्ड स्पेसिफाईड एक्झामिशन अँक्ट १९८२ कलम ५(१),(२),(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपीच्या गैरप्रकाराबाबत खुद्द जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून, तहसीलदारांमार्फत अहवाल मागविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
केंद्र संचालकासह उपसंचालकावर गुन्हे दाखल
By admin | Updated: March 9, 2015 02:17 IST