पांडवउमरा (वाशिम) : वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पाणीपुरवठा कामाला मंजुरात दिली. पाणीपुरवठय़ाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होउन १५ दिवस झाले खरे; मात्र सव्वा दोन कोटी रुपये किंम तीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर अंदाजपत्रक व माहितीदर्शक फलक अजूनही लावले नाही. संबंधितांनी फलक लावण्याचे आदेश बासनात गुंडाळल्याचे यावरुन दिसून ये ते. पाणी पुरवठय़ाच्या कामाची सुरुवात टाकी बांधकाम करण्यापासून केली आहे. बांधकामाकरीता वापरण्यात येत असलेली रेती ही मातीमिश्रीत असून ती रेती पाण्याने धुवून नंतर त्याचा वापर बांधकामाकरीता करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कामाविषयी उ पलब्ध निधीच्या लेखाजोखाच्या माहितीदर्शक फलक लावला असता तर खरा चेहरा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. टाकी बांधकामाच्या कॉलमवर नियमितपणे पाणी सुद्धा टाकण्यात येत नाही. शासनाने दिलेला २ कोटी २५ लाख रुपयातून सदर काम होत आहे. वाशिम तालुक्यातील आसोला जहाँगीर, पांडवउमरा येथील पाणीपुरवठय़ाचे काम सुरु करुन दहा वर्षे होत आहेत. मात्र अजूनही ते काम अपूर्णच असल्याचे चित्र पहावयास मिळ ते.
नियम काय म्हणतो..
शासन निर्णयानुसार दीड लाख रुपयावरील कोणत्याही शासकीय बांधकामावर कामाविषयी अंदाजपत्रक व माहितीदर्शक फलक लावणे गरजेचे आहे.
अधिकारी काय म्हणतात..
काम चांगल्या दर्जाचे होत आहे. बांधकामावर माहितीदर्शक फलक लावण्याची गरज नसल्याचे वाशिम येथील महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे शाखा अभियंता पी.एम. देशमुख यांनी सांगीतले.