मेडशी (जि. वाशिम): अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक एक कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. हा प्रकार २२ मे रोजी सकाळी ८.३0 वाजताच्या दरम्यान घडला.एन.एल. 0१ एल १६८२ क्रमांकाचा कंटेनर नागपुरवरून औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाला. मालेगाववरून औरंगाबादला जाण्याऐवजी रस्ता चुकीमुळे सदर कंटेनर मेडशीकडे आला. ही चूक चालकाच्या उशिराने लक्षात आल्यानंतर, चालकाने मेडशीनजीकच्या ब्राह्मणवाडा फाट्यानजीक कंटेनर मागे वळविण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणवाडा फाट्याकडे कंटेनर टाकला असता, रस्ता चढ-उताराचा असल्याने कंटेनरची कॅबीन उताराकडे व मागचा भाग रस्त्याच्या बाजूला अडकला. मागे वळविण्याच्या प्रयत्नात कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस विभागाच्या सहकार्याने सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास कंटेनर मागे वळविण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली.
कंटेनरचा रस्त्यावरच ठिय्या; वाहतूक जाम
By admin | Updated: May 23, 2016 01:25 IST