शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना घरपोच मिळणार स्मार्टकार्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

वाशिम : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे संकट उभे आहे. खबरदारीचा प्रयत्न म्हणून, ...

वाशिम : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे संकट उभे आहे. खबरदारीचा प्रयत्न म्हणून, तसेच कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम कामगारांना यापुढे घरपोच स्मार्टकार्ड दिलेे जाणार आहे.

राज्यात जून २०२१ पासून ‘ब्रेक द चेन’ कालावधीतील ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजूर होऊन सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडून नोंदणी अर्ज मंजूर झालेले आहेत व या कार्यालयाकडून ओळखपत्र अर्थात स्मार्ट कार्ड देण्याबाबत एसएमएस प्राप्त झाले आहेत, असे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात जिल्हा कार्यालयाकडे येत आहेत. बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापूर्वीच मंजूर झालेले आहेत व त्या बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशा बांधकाम कामगारांचे ओळखपत्र अर्थात स्मार्टकार्ड फिल्ड एजंट, खास दूत, कुरिअर, पोस्ट ऑफिसमार्फत बांधकाम कामगांराना वितरित करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी नेांदणी, नूतनीकरण व लाभाबाबत ऑनलाइन प्रक्रियेचा लाभ घ्यावा व जिल्हा कार्यालयात बांधकाम कामगारांचा जमाव होणार नाही व कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या निर्बंधांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

----------------------------एकूण नोंदणीकृत बांधकाम कामगार १९४४५

------------------------------नोंदणी फी भरणे आवश्यक

नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळ खाती जमा केलेली नाही अशा बांधकाम कामगारांना खासगी संस्थेकडून लघुसंदेश एसएमएसद्वारे पेमेंट लिंक पाठविण्यात आलेली आहे. या लिंकद्वारे बांधकाम कामगाराने पेमेंट गेटवेमार्फत नोंदणी फी व वर्गणीची फी मंडळ खाती जमा करताच नोंदणी क्रमांक व पुढील नूतनीकरणाचा दिनांक एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे. या नोंदणी क्रमांकाच्या आधारे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने घेता येईल. या बांधकाम कामगारांना यथावकाश ओळखपत्र वितरित करण्यात येईल.

------------------------कोट

खबरदारीचा उपाय म्हणून व कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम कामगारांना घरपोच स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. मंडळामार्फत ९ जून २०२१ पासून नेांदणी फी व वर्गणीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने पेमेंट गेटवेमार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी अर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळामार्फत पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसद्वारे पेमेंट गेटवेची लिंक पाठविण्यात येत आहे. या लिंकचा वापर करून बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

- गौरव नालिंदे

सरकारी कामगार अधिकारी वाशिम