शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांधकाम साहित्य महागले; घरकुलाचे अनुदान ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:36 IST

Construction materials became expensive : एका वर्षात सिमेंट, विटा, रेती, लोखंड आदींच्या भावात दीड पटीने वाढ झाली.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ आता सिमेंट, विटा, लोखंडाचे दरही वाढले आहेत. एका वर्षात सिमेंट, विटा, रेती, लोखंड आदींच्या भावात दीड पटीने वाढ झाली, तर घरकुलाचे अनुदान मात्र ‘जैसे थे’च असल्याने बांधकाम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न सहा हजार लाभार्थींसमोर उभा ठाकला आहे.देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जून महिन्यापर्यंत बांधकामेही ठप्प होती. त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाले आणि बांधकाम क्षेत्राला परवानगी मिळाली. लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जूनदरम्यान उत्पादक कंपन्या प्रभावित झाल्याने त्यानंतर बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. स्टील, सिमेंट, विटाच्या दरात वाढ झाल्याने साहजिकच घरांचे बांधकामही महागले. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. संचारबंदी व कडक निर्बंध लागू आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. उत्पादक कंपन्यांकडून होत असलेली ही दरवाढ घरकुल लाभार्थ्यांना जबर फटका देणारी ठरत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सिमेंटच्या एका गोणीचे भाव ३०० ते ३३० रुपयांदरम्यान होते. आता हेच दर ३९० ते ४१० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्ये लोखंडाचे दर प्रति किलो ३८ ते ४६ रुपयांदरम्यान होते. आता हेच दर ५६ ते ५८ रुपयांपर्यंत झेपावले आहेत. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट व लोखंडाचे भाव वाढल्याचे सांंगण्यात येत आहे. मजुरी, विटा, रेती, गिट्टीच्या भावातही वाढ झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी गत ६ वर्षांपासून १.२० लाख रुपयेच अनुदान आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण कसे करावे, हा आर्थिक पेच लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे. सन २०२०-२१ मध्ये दोन हजार घरकुले आणि त्यापूर्वीची अपूर्ण असलेली  जवळपास चार हजार घरकुले अशा एकूण सहा हजार घरकुल लाभार्थींना या दरवाढीचा फटका बसला आहे.

 

एकिकडे बांधकाम साहित्याच्या किंमतीत दर दोन, तीन महिन्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे अनुदान मात्र जैसे थे राहत आहे. महागाईमुळे १.२० लाखात घरकुल बांधकाम पूर्ण कसे करावे? हा महत्वाचा प्रश्न आहे.- गौतम वानखडेघरकुल लाभार्थी.

कोरोनामुळे गतवर्षी काही महिने उत्पादक कंपन्या बंद होत्या. वाहतूकही प्रभावित होती. याचा परिणाम म्हणून दरवाढ झाल्याचे तेव्हा सांगण्यात येते होते. आता परत बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. तीन महिन्यात सिमेंटच्या गोणीमागे ५० ते ६० रुपये वाढ झाली.- वीरेंद्र बागरेचा,बांधकाम साहित्य विक्रेता

टॅग्स :washimवाशिम