वाशिम : जिल्ह्यात बेघरांसाठी जवळपास ६६१९ घरकुलं मंजूर झालेली असून, फेब्रुवारीअखेर २४00 लाभार्थींंंना साडेआठ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले. अद्याप ४२00 घरकुलांचे बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास योजना अमलात आणली आहे. दारिद्रय़रेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) २0१५ च्या ऑगस्ट महिन्यात लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर लाभार्थींंंचे प्रस्ताव जमा करणे आणि पंचायत समितीकडे पाठविण्याची कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावरून करण्यात आली. परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर बांधकामाला परवानगी मिळाली. फेब्रुवारी २0१६ अखेर २४00 लाभार्थींंंना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अनुदानापोटी साडेआठ कोटी रुपये वितरित करण्यात आले. बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान वितरित केले जाते. पूर्वी पंचायत समिती स्तरावर लाभार्थींना धनादेश दिले जात होते. या पद्धतीत आता बदल केला असून, लाभार्थीं बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते.
४२00 घरकुलांचे बांधकाम अपूर्ण
By admin | Updated: March 4, 2016 02:15 IST