शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:06 IST

वाशिम: दिवसागणिक पेट्रोल व डिझेलच्या किमतीत  भरमसाट वाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे  मोडत आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या विद्यमान  सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप  करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे  सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशासनाविरुद्ध घोषणाबाजीदरवाढ मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवसागणिक पेट्रोल व डिझेलच्या किमतीत  भरमसाट वाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे  मोडत आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या विद्यमान  सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप  करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे  सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.गेल्या दीड महिन्यात पेट्रोल व डिझेल दरात सुमारे ५0 टक्के  वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरेलच्या दरामध्ये  घसरण होत असताना राज्यात मात्र पेट्रोल व डिझेल  दरवाढीचा भडका उडाला. यास सर्वार्थाने विद्यमान शासनच  कारणीभूत असल्याचा मुद्दा समोर करत काँग्रेसने सोमवारी  जिल्हय़ातील मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा  या चार तालुक्यांमध्ये निदर्शने आंदोलन करून आपला रोष  व्यक्त केला, तर रिसोड येथे मंगळवारी आणि वाशिममध्ये  बुधवारी आंदोलन केले जाणार आहे.  यासंदर्भात प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद  करण्यात आले आहे, की पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने  वाढतच आहेत. १७ जुलै रोजी पेट्रोलचा प्रतिलीटर दर ६३  रुपये होता. तो सध्या तब्बल ८0 रुपये प्रतिलीटरवर पोहचला  आहे. जागतिक बाजारात बॅरेलच्या दरात सातत्याने घसरण  होत असताना राज्यात मात्र इंधन दरात होत असलेल्या  दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाट  वाढले आहेत. दरम्यान, स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ रद्द  करावी, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे, आदी मागण्या  काँग्रेसने केल्या.