कारंजालाड (जि. वाशिम) : केंद्रात व राज्यात असणार्या भाजपा सरकारचा निषेध करून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अल्पसंख्यांक तथा दलितांचे हित न साधता उद्योजकांना हे सरकार फायदे देत आहे. या धरणे आंदोलनात कमिटीने यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत करावी, सरसकट कर्ज माफ करावे, पूर्णपणे वीज बिल माफ करावे, केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादने कायद्यातील शेतकर्यावरील अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ५ रूपये किलो तांदूळ व १0 रूपये किलो गहू शासकीय दराने देण्यात येत होते ती योजना पूर्ववत करावी, रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, शेतमालाला उच्च दर्जाचा भाव देण्यात यावा, गुरांसाठी चारा डेपो उघडावेत तथा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
कारंजात काँग्रसचे धरणे आंदोलन
By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST