शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट; विद्यार्थी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७१५ शाळा आहेत. या शाळांत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, प्रशस्त क्रीडांगण, चांगली आसन व्यवस्था आदी ...

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७१५ शाळा आहेत. या शाळांत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, प्रशस्त क्रीडांगण, चांगली आसन व्यवस्था आदी सुविधांसह शौचालये आवश्यक आहेत. तथापि, जिल्ह्यातील अनेक शाळांतील शौचालये किंवा प्रसाधनगृहांची अवस्था वाईट झाली आहे. त्यात काहींची मोडतोड झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करणे गरजेच आहे, तर काहींची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीमही राबविली जात आहे. निती आयोगाच्या निकषानुसार हे काम केले जात आहे. तथापि, प्रक्रिया संथ असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या मागील भागांत किंवा प्रांगणाच्या बाहेर लघुशंका आणि शौचास जावे लागत आहे. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ६६ शाळांतील शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे.

-============

शाळांतील तालुकानिहाय शौचालयांची स्थिती

तालुका दुरवस्था झालेली शौचालये मोडकळीस आलेली शौचालये

वाशिम ०७ ०३

मालेगाव ०९ ०३

मं.पीर १० ०२

रिसोड ०७ ०८

कारंजा ०९ ०६

------------------------------------

एकूण ४२ २२

----------------------------------------

१५ शाळांत स्वच्छतागृहेच नाहीत

जिल्ह्यातील ६६ शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट असताना १५ शाळांत शौचालयेच नाहीत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागते. प्रामुख्याने मुलींना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल तातडीने घेण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.

---------------

या आहेत अडचणी

जिल्ह्यातील जि.प. शाळांतील शौचालये किंवा प्रसाधनगृहांची अवस्था वाईट असल्याने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागतेच शिवाय पाचवी ते सहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास बसावे लागते. यामुळे स्वच्छता अभियानालाच तडे जात आहेत.

-----------

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा ७१५

---

मोडकळीस आलेली शौचालये

२२

-------------

दुरवस्था झालेली शौचालये

४२

------------

दुरुस्तीसाठी आवश्यक निधी

१००००००