शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:16 IST

Washim News : हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   ग्रामीण भागातील जनतेला  सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकांना बिघाडाचे ग्रहण लागले आहे. दिवसाला ८ संगणक आणि प्रिंटर नादुरुस्त होत असल्याने ग्रामीण भागांतील शेतकरी, विद्यार्थ्यांसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले, नाहकरत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला आदी १३ प्रमाणपत्रासाठी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना अर्जदारांना लांब रांगेत उभे राहणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे मिळवू शकतात.  ही सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत; परंतु आता या सेवा केंद्रातील संगणक जुने झाल्याने त्यात वारंवार बिघाड होत असून, दिवसाला ८ संगणक नादुरुस्त होत असल्याची माहिती या यंत्रणनेशी निगडीत घटकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. 

५० संगणक संच निकामीचजिल्ह्यातील ४९१ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी दरदिवशी ८ केंद्रांतील संगणकात बिघाड होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे कठीण होत आहे. त्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील ५० संगणक संच निकामीच झाल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली असून, हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे. 

१० वर्षांपासून नवी खरेदीच नाहीआपले सरकार सेवा केंद्र योजना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतीत या योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांसाठी २०११ मध्ये संगणक संचांची खरेदी करण्यात आली. आता दहा वर्षे उलटत आले असून, याच संगणक संचांच्याआधारे आपले सरकार सेवा केंद्रांचे काम सुरू असून, नवे संच खरेदीच करण्यात आलेले नाहीत. 

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे संगणक १० वर्षे जुने असून, त्यात आता वारंवार बिघाड होत असल्याने जनतेला सुरळीत सेवा देण्यात अडचणीत येत आहेत.- शेखर हिरगुडेआपले सरकार सेवा केंद्रचालक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम