शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अमरावती विभागातील बियाणे नमुन्यांची तपासणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:40 IST

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांकडून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देबीटी कपाशी बियाण्यासह नॉन बिटी कपाशी आणि इतरही पिकांच्या विविध वाणांचे नमुनेही संकलित करण्यात आले. बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून एचटी जीन तपासणीकरिता घेण्यात आलेल्या संकरित कापूस ३०२८- बीजी-२ या वाणाचा नमुना सदोष आढळला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांकडून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. विविध पिकांच्या बियाण्यांच्या एकूण ३५ प्रकारच्या नमुन्यांचा यात समावेश आहे. प्रयोगशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे गुणनियंत्रक विभागाकडून आता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदाच्या हंगामात बनावट बीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान व पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. बीटी कपाशी बियाण्यासह नॉन बिटी कपाशी आणि इतरही पिकांच्या विविध वाणांचे नमुनेही संकलित करण्यात आले. हे बियाणे महाराष्ट्र बी-बियाणे नियम, २००९ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम १० व ११ अन्वये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर संचालकांकडे २५ मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात अंकुर कंपनीच्या मलकापूर येथील बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून एचटी जीन तपासणीकरिता घेण्यात आलेल्या संकरित कापूस ३०२८- बीजी-२ या वाणाचा नमुना सदोष आढळला होता. त्यामुळे संबंधित कंपनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता उर्वरित बियाण्यांच्या विविध वाणांची तपासणीही पूर्ण झाली असून, यासंदर्भातील माहिती अमरावती विभागीय कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या संचालकांकडून प्राप्त अहवालाची तपासणी गुणनियंत्रक विभाग करून त्यावर एक सर्वंकष अहवाल तयार करण्यात येणार आहे.जिल्ह्यातून बीटी, नॉन बीटी कपाशीसह इतर पिकांच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. ही तपासणी पूर्ण होऊन विभागीय स्तरावर त्याबाबतचा रिपोर्ट आला आहे. सोमवारी याबाबत विभागीय कृषी संचालक कार्यालयात त्या रिपोर्टची पाहणी करण्यात येणार आहे, त्यानंतरच अहवाल सादर करण्यात येईल.- डी. आर. साठे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती