शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम बाजार समितीत पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 14:27 IST

वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला.

ठळक मुद्दे शेडमध्ये पुरेशी जागा नसताना तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत आहे. शनिवारी हा व्यवहार सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतकरी आणि व्यापाºयांना सावरायची संधीच मिळाली नाही आणि लाखो रुपयांचा शेतमाल पावसात पूर्णपणे भिजला.

वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव करण्यासह तो विक्री होऊन उचल होईपर्यंत सुरक्षीत राहावा म्हणून ११ शेड उभारले आहेत. यापैकी ६ शेडमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यात आला. खरिप हंगाम तोंडावर आल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली असताना आणि शेडमध्ये पुरेशी जागा नसताना तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत आहे. लिलाव झाल्यानंतर व्यापारी मालाची मोजणी करून पोती भरतात. शनिवारी हा व्यवहार सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांना सावरायची संधीच मिळाली नाही आणि लाखो रुपयांचा शेतमाल पावसात पूर्णपणे भिजला. यावेळी खाली मोकळा ठेवलेला शेतमाल सावडण्यासह भरलेली पोती उचलण्यासाठी व्यापारी, शेतकरी आणि हमा मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली होती. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर उघड्यावर ठेवलेला शेतमाल पावसामुळे भिजण्याची भिती असल्याने आडते आणि व्यापारी मंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडच्या खरेदीचा शेडमधील माल उचलण्याच्या सुचना देण्याची मागणीही केली होती. दरम्यान, या प्रकाराची दखल बाजार समितीच्या प्रशासकांनी घेतली असून, पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी नाफेडचा शेडमधील शेतमाल उचलण्याच्या सुचना खरेदी विक्री संस्थेला त्यांच्यावतीने देण्यात आल्या आहेत, तसेच पुढे शेतकरी, व्यापाऱ्यांच्या शेतमालाची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन बाजार समितीचे मुख्य प्रशासक बंडू पाटील महाले यांनी दिले आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम