शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:43 IST

राधा भगवान आढाव (वय २४ वर्षे) ही विवाहित महिला व तिचा प्रियकर सुरज विठ्ठल पवार (वय २४ वर्षे) या दोघांनी सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

शिरपूर जैन (वाशिम) : येथील जुन्या आठवडी बाजार परिसरात भाड्याने असलेल्या घरात वास्तव्यास असलेल्या राधा भगवान आढाव (वय २४ वर्षे) ही विवाहित महिला व तिचा प्रियकर सुरज विठ्ठल पवार (वय २४ वर्षे) या दोघांनी सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, मृतक विवाहित महिला राधा आढाव हिला तिच्या पतीकडून दोन अपत्य आहेत. असे असताना तीचे सुरज पवार या युवकासोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले आणि ती सुरजसोबत परगावी निघून गेली. तिच्या मामाने व सास-याने या प्रकरणी शिरपूर पोलिसात फिर्याद देखील दाखल केली होती. दरम्यान, काही दिवसांनी राधा ही घरी परत आली व पती आणि मुलांसोबत वास्तव्य करायला लागली. अशात ती पुन्हा काही दिवसांपूर्वी घरून निघून गेली आणि १८ डिसेंबर रोजी गावात परतली.आल्यानंतर तिने प्रथम आपली दोन्ही मुले गावातच राहणा-या सासू, सास-यांकडे नेऊन घातली; तर पती रात्रीच्या सुमारास शेतात रखवालीसाठी गेलेला होता. दुस-या दिवशी, १९ डिसेंबरच्या सकाळी मृतक तथा राधाचा प्रियकर सुरज पवार व राधा आढाव यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. राधाच्या सास-यांनी ही माहिती शिरपूर पोलिसांना कळविली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, बीट जमादार माणिकराव खानझोडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे पाठविला.