शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:44 IST

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची उपस्थिती होती. ...

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची उपस्थिती होती. तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी या बैठकीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणाबाबत माहिती द्यावी. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दवंडी देणे, ध्वनिक्षेपकावरून माहिती देऊन गावामध्ये जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे. ज्या भागात कमी लसीकरण झाले आहे, त्याठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविणे आवश्यक आहे. याअनुषंगाने लवकरच तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेविषयी तालुकानिहाय माहिती दिली. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना केल्या.

००००००००००००

लसीकरण सत्रांचे आयोजन

जिल्ह्यात सध्या लसींची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या अंतर्गत लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. लसीचा पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पहिला डोस दिल्यानंतर त्यांना दुसरा डोस कधी देय आहे, याविषयी माहिती द्यावी. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती द्यावी. लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शहरी व ग्रामीण भागातील ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.