शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:05 IST

Water Scarcity : महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

- यशवंत हिवराळेराजुरा- मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात सध्या स्थितीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पूरवुन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.

खैरखेडा गावात पाणी टंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टॅंकर हे जणू गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून समीकरण बनले आहे. आदिवासी व बंजारा समाज बहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावाचा संपूर्ण भुभाग खडकाळ डोंगरदऱ्या व कडा कपारींनी वेढलेला आहे. गावात पाचशे फुटावर कूपनलिका घेऊनही त्याला पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नसल्याने या गावात सार्वजनिक तथा खाजगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पानवठा नाही. गावात एकही हातपंप वा पानवठा नसलेलं बहुदा हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील जनतेची तहान दुषीत पाण्यावर भागवली जाते. बरेचदा नदीपात्रातील ज्या डोहावर कुत्रे,गुरे पाणी पितात, त्याच डोहानजीक झीरि खोदून त्यातील दुषीत पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे वास्तव आहे. महिलांनाही धुणे धुण्यासाठी गाव परिसरातील दोन कि.मी.अंतरावरील नदी पात्रातील डोहावर पायपीट करून भर उन्हात जाव लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. उपाययोजना शून्य असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई