शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नागरिकांनी बुजविले हायवेवरील खड्डे

By admin | Updated: March 13, 2015 01:51 IST

निसर्ग मित्र मंडळाचा पुढाकार : दहा दिवसात २५ अपघात

वाशिम : अकोला हायवेवरील बाहेती हॉस्पिटलपासून ते चिंतामणी सर्व्हिसिंग नजीक रस्त्यावर जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले. १ मार्च ते १0 मार्चपर्यंत या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे २५ अपघात झाले. यामधील काही अपघात किरकोळ, तर काही गंभीर स्वरूपाचे होते. या अपघातात जखमी झालेल्यांना निसर्ग मित्र मंडळाच्यावतिने दवाखान्यात नेवून उपचार करण्यात आले. रस्त्यावरील खड्डयांमुळे होणारे अपघात पाहता येथील निसर्ग युवा मित्रमंडळाच्या पुढाकाराने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टरव्दारे माती व मुरुम टाकून खड्डे बुजवले आहेत. या समाजसेवी कार्याबद्दल नागरीकांतून कौतुक होत आहे.शहरातून जाणार्‍या हिंगोली अकोला हायवेवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यातच हा मार्ग शहरातून गेला असल्यामुळे इतर राज्यातून येणारे ओव्हरलोड वाहने व शहरातून जाणार्‍या वाहनांची या मार्गावर एकच गर्दी असते. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्डय़ांवर दुचाकी उसळून अनेक अपघात होत आहेत. दुरवरुन हे खड्डे दिसत नसून जवळ गेल्यावरच वाहनधारकांना खड्डे दिसतात. त्यातच रात्रीच्या वेळेस अचानक खड्डयांतुन वाहने उसळून अपघात घडले आहेत. प्रवासी व नागरीकांना होणारा हा त्रास लक्षात घेवून येथील निसर्ग युवा मित्रमंडळाच्या पदधिकार्‍यांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टरव्दारे मुरुम व माती आणून खड्डे बुजविले. या कामी निसर्ग युवा मित्रमंडळाचे पदाधिकारी दशरथ वाटाणे, सागर वाटाणे, भुराराम चौधरी, भगवान, राम यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला.