शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनो, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात कोणतीही माहिती लपवू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:09 IST

कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी कधी तर जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोनाबाधित व्यक्तींना दूर लोटतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाने कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.कोरोना विषाणू संसर्गापासून होणारा कोविड-१९ हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यूच होणार, हा गैरसमज आहे. लवकर निदान व उपचाराने कोरोना संसर्गावर मात करता येते. ज्या प्रमाणे इतर संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती बरी झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होत नाही, त्याचप्रमाणे कोविड-१९ या आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा इतरांना कोणताही संसर्ग होत नाही. त्यामुळे अशा ‘कोविड’मुक्त व्यक्तींपासून दुरावा न ठेवता, त्यांना मानसिक आधार देण्याचे आवाहनही मोडक यांनी केले. कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, या संसगार्चे निदान होण्यास विलंब होतो, डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कुणीही माहिती लपवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरजकोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकरत लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारासोबतच मानसिक आधाराची सुद्धा गरज असते. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यू होतो, असे नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. या संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार घेतल्यानंतर अनेकजण या आजारावर मात करून परतले आहेत. ते सर्वजण कोरोनामुक्त जीवन जगत आहेत, समाजात वावरत आहेत. तरीही लोकांच्या मनामध्ये कोरोना संसर्गाविषयीचा गैरसमज कायम आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीकडून इतरांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे कोरोनावर मात करून परतल्यानंतर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मोडक यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या