राजुरा येथील युवराज गावंडे हा चिमुकला गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घरासमोरील परिसरात खेळत होता. खेळतखेळत तो जवळच असलेल्या मारोती गावंडे यांच्या घरासमोरील विहिरीकडे गेला आणि तोल जाऊन विहिरीत पडला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या चिमुकल्यांनी धावत जाऊन युवराजच्या घरी ही माहिती दिली. त्यामुळे घरातील सदस्यांनी आरडाओरड ऐकून विहिरीकडे करीत धाव घेतली. त्यांचा आवाज ऐकून जि.प. शाळा परिसरात श्रमदान करण्यासाठी गोळा झालेल्या ग्रामस्थांनीही विहिरीकडे धाव घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता त्यातील युवकांनी दोराच्या आधारे विहिरीत उतरून युवराजला बाहेर काढले. युवराजला बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका रेखा भोंबळे यांनी उपचार केले. युवराजला बाहेर काढण्यासाठी पोलीस पाटील डॉ. धनंजय राजुरकर, बीट जमादार शैलेश ठाकूर, संतोष घुगे, नागेश गावंडे, डिगांबर भगत, राहुल सानप, शंकर गावंडे, गजानन गायकवाड यांच्यासह इतर युवकांनी सहकार्य केले.
===Photopath===
150121\15wsm_2_15012021_35.jpg
===Caption===
२५ फूट खोल विहिरीत पडूनही चिमुकला सुरक्षीत