शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोहळ्यात सखी चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:09 IST

वाशिम : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे.  

ठळक मुद्दे श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्यमजेदार उखाणे सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे.  स्थानिक स्वागत लॉन्स् येथे लोकमत सखी मंच तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वाघ बकरी चहाकडून राकेश गुप्ता व कार्यक्रमाच्या परीक्षक सुरभी उखलकर, सीमा राठोड या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे वाघ बकरी चहा ब्रेव्हरेज पार्टनर असून, सखींनी वाघ बकरी चहाचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमात फॅशन शो दरम्यान सखींनी श्रावणातील नैसर्गिक दागिने परिधान करून कॅटवॉक करीत उपस्थितांची दाद मिळविली. तसेच मंगळागौरचे खेळदेखील मंचावर सादर करण्यात आले. तसेच उखाणा स्पध्रेत श्रावणावर आधारित उखाणे सादर केले त्याच प्रमाणे थाली सजावट स्पध्रेत महिलांनी अतिशय सुबक पद्धतीने थाली सजवून स्पध्रेला रंगत आणली. सखींनी स्पध्रेचा यथेच्छ आनंद घेत भरपूर बक्षिसे जिंकली.

विजेते स्पर्धक (अंतिम निकाल)- पूजा थाली सजावट स्पर्धा : शोभा गायकवाड (प्रथम), दीपाली छापरवाल (द्वितीय)- उखाणे स्पर्धा : प्रतिभा बोराळकर (प्रथम), ज्योती आगतकर (द्वितीय)- फॅशन शो स्पर्धा : पायल छापरवाल (प्रथम), जया पुराणकर (द्वितीय)- मंगळागौर स्पर्धा : श्रावणी सरी ग्रुप (प्रथम), श्रावण सखी ग्रुप (द्वितीय)