शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

कोरोना रोखण्यासाठी वाशिम जिल्हा सीमेवर पुन्हा चेकपोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:57 IST

Washim News जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्हा सीमांवर पुन्हा चेक पोस्ट सुरू करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना  नजीकच्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्हा सीमांवर पुन्हा चेक पोस्ट सुरू करण्यात येत आहेत. त्यात कारंजा तालुक्यात पाच ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या असून, येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या आठवडाभरातच जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यालगतर असलेल्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाला असून, या जिल्ह्यातील हजारो नागरिक दरदिवशी वाशिम जिल्ह्यात बिनदिक्कत प्रवास करीत आहेत. यातून वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिकच फोफावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट सुरू करण्यात येत आहेत. कारंजा तालुक्यातील दोनद, खेर्डा, ढंगारखेड, महागाव आणि  सोमठाणा येथे कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या आदेशानुसार चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या असून, या ठिकाणी परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.

प्रत्येक चेकपोस्टवर ४ कर्मचारीकारंजा तहसीलदारांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सीमेवर सुरू करण्यात आलेल्या पाच चेकपोस्टवर दोन आरोग्य कर्मचारी आणि दोन पोलीस मिळून चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी येणारी वाहने पोलिसांकडून थांबविण्यात येतात. त्यानंतर आरोग्य कर्मचारी दुचाकीवरील किंवा चार चाकी वाहनामधील प्रवासी नागरिकांची २४ तास तपासणी करीत आहेत. 

संदिग्धांची रवानगी आरोग्य केंद्रातजिल्ह्याच्या सीमेवर सुरू करण्यात आलेल्या चेकपोस्टवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर त्यांना ताप किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे आढळल्यास संबंधित जिल्हा आरोग्य विभागाला त्याची माहिती देण्यात येणार आहे. 

अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरच तपासणी करण्यासाठी पाच चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आरोग्य विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.-धीरज मांजरे,तहसीलदार, कारंजा 

टॅग्स :washimवाशिम