शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मार्गासाठी भूसंपादनात  मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:19 IST

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत.या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दिशाभूल होत असल्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकेत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील बहुप्रतिक्षीत नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गात मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे. तथापि, या भूसंपादन प्रक्रि येत ठरलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे; परंतु प्रशासकीय अधिकारी या उद्देशाला तडा देत आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती बागायती अर्थात सिंचन क्षेत्राखालील असतानाही ती कोरडवाहू दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या शेतकºयांना गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली. त्याच शेतकऱ्यांची नोंद कोरडवाहू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अनेक शेतकºयांकडे पक्क्या पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची पूर्ण सुविधा आहे. त्यांनाही कोरडवाहू दाखविले आहे. त्याशिवाय फळबागधारक शेतकऱ्यांचीही कोरडवाहू म्हणून अधिकाºयांकडून नोंद केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार संपादित जमिनीचा मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्याच्या मानसिकतेत राहिले नसून, त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केले आहे. तथापि, अधिकारी वर्ग मात्र शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करीत असल्याचा आरोपही शेतकºयांनी निवेदनातून केला आहे. सुभाष गणेशलाल मानधने, शोभा डिगांबर दहात्रे, विजय दहात्रे, मनोज दहात्रे, कृष्णा दहात्रे, गजानन श्रीकिसन दहात्रे, कैलाश दहात्रे, दलाल धन दहात्रे, राजू दहात्रे, सुर्यप्रकाश दहात्रे, रमेश दहात्रे, स्वाती दहात्रे, ज्योती दहात्रे आदि शेतकºयांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले असून, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणीसमृद्धी मार्गासाठी शेतकºयांकडून जमिनी घेताना त्याचा योग्य मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, या मार्गासाठी अधिकारी वर्ग दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार, पालकमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMalegaonमालेगांव