शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दोन शिक्षणाधिका-यांसह संस्थाचालकावर फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: January 3, 2015 01:22 IST

बनावट दस्तावेजाद्वारे पदनिर्मिती.

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील प.दी. जैन विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर व शिपाई अशी तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली व त्याठिकाणी तिघांची नेमणूक केल्याचे शिक्षण उपसंचालकांना चौकशी दरम्यान निदर्शनास आले. याप्रकरणी अमरावतीचे शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनसिंग पोलिसांनी दोन शिक्षणाधिकारी, संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापकासह ११ जणांवर १ जानेवारी रोजी भादंविचे कलम ४२0, ४0९, ४६५, ४६८, ४७१, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. वाशिम जिल्हा परिषदेचे विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, सन २0१२-१३ मध्ये कर्तव्यावर असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्‍वास लबडे, अनसिंग येथील स्वादवाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धरमचंद वाळली, प.दी. जैन विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य रूपचंद वाळली, किरणकुमार वाळली, संजय वाळली, सुभाष कदम, मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी संगनमत करून कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर व शिपाई अशी तीन पदे बनावट दस्तावेज बनवून निर्माण केली व त्याठिकाणी स्वप्निल वाळली, संजय नवघरे व केशव कालापाड यांची नियुक्ती केली. नेमणूक करण्यात आलेल्या तीन कर्मचार्‍यांनी वेतनापोटी शासनाकडून २७ हजार रूपयांची उचल करून अपहार केला. उपरोक्त शिक्षणाधिकारी, संस्था अध्यक्ष, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक व कर्मचार्‍यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली व कागदपत्रे गहाळ करून पुरावे नष्ट केले, अशा प्रकारची फिर्याद शिक्षण उपसंचालक पवार यांनी अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली . या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ४२0, ४0९, ४६५, ४६८, ४७१, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सी.आर. कदम करीत आहेत.