शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शुल्क आकारणी नियम ‘धाब्या’वर!

By admin | Updated: May 9, 2016 02:01 IST

शिक्षक-पालक संघाच्या बैठकींना खो; मंजुरीविना शैक्षणिक शुल्काची आकारणी, पालक मात्र अनभिज्ञ.

संतोष वानखडे / वाशिमविद्यार्थ्यांंना दज्रेदार शिक्षण देण्याच्या नावाखाली काही खासगी शैक्षणिक संस्थांनी पालकांची अक्षरश: लूट चालविली आहे. शिक्षक-पालक संघाच्या बैठकीतून शैक्षणिक शुल्काची निश्‍चिती करण्याच्या नियमाला धाब्यावर बसवून, मनमानी पद्धतीने आकारण्यात येणार्‍या शुल्काने सर्वसामान्य पालकवर्गाचे कंबरडे मोडत आहे. शैक्षणिक क्रांती झाल्याने ग्रामीण भागातील पालकदेखील शहरातील नामांकित शाळेत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी धडपडत असतो. जिल्ह्यात शासनमान्य ७८ खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळा आहेत. या व्यतिरिक्त नर्सरी, केजी-१, केजी-२, पूर्वप्राथमिक अशा शाळांचे पीकही चांगलेच बहरले आहे. पूर्व प्राथमिक शाळेत बारावी, पदवीधर उमेदवारच शिक्षक बनले आहेत. अशा शाळेतील अप्रशिक्षित शिक्षकांच्या हाती पाल्याचे शैक्षणिक भवितव्य सोपवून पालकवर्ग शैक्षणिक शुल्काचा अतिरिक्त भारही सहन करीत असल्याची परिस्थिती आहे.बहुतांश पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देत असल्याने प्रवेशासाठी वेटींग लिस्ट लागत आहे. पालकांचा वाढलेला कल कॅश करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. विद्यार्थ्यांंचा सर्वांंगीण विकास-हाच आमचा ध्यास या गोंडस नावाखाली काही संस्था पालकांकडून भरमसाठ शैक्षणिक शुल्क आणि देणगी आकारतात. हा प्रकार राज्यात सर्वत्रच आढळतो. भरमसाठ शैक्षणिक शुल्काबाबत राज्यस्तरावर तक्रारी झाल्याने शासनाने २0११ मध्ये शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक शुल्काची आकारणी निश्‍चित करावी, असा नियम केला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन - २0११ नुसार शैक्षणिक शुल्क पालकांच्या संमतीने निश्‍चित होणे अपेक्षित आहे. शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत बहुमताने निर्णय झाल्यानंतर शैक्षणिक शुल्क आकारणे संबंधित शाळेला बंधनकारक आहे; मात्र या नियमाबाबत पालक अनभिज्ञ असल्याने संस्थेच्या मागणीनुसार शैक्षणिक शुल्काची आकारणी होत आहे.