शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

बोगस शिधापत्रिकांना बसणार ‘चाप’!

By admin | Updated: May 7, 2017 23:56 IST

अर्ज नमुन्यात बदल; अनावश्यक मुद्दे वगळले

वाशिम : शिधापत्रिका मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच बोगस शिधापत्रिकांना चाप बसविण्याच्या दृष्टीने अर्जाच्या नमुन्यात बदल करण्यात आले आहेत. या बदलाच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थींना आता सुधारित नमुन्यानुसार अर्ज सादर करावे लागणार आहेत.राज्यामध्ये १ मे १९९९ पासून तिहेरी शिधापत्रिका योजना लागू करण्यात आली आहे. पिवळ्या शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका, शुभ्र शिधापत्रिका असे तीन प्रकार असून, अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे पात्र कुटुंबाला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार या शिधापत्रिकांचे वितरण केले जाते. पात्र कुटुंबाला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार शिधापत्रिकांचे वितरण होण्यासाठी शासनाने वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. शिधापत्रिका वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची इत्थंभूत माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून ६ मे २0१७ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अर्ज नमुन्यात काही बदल केले आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात येणार्‍या सर्व सेवांबाबतच्या अर्जाचे नमुने एका पानाचे करण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुषंगाने शासन स्तरावर विचारमंथन झाले आणि शिधापत्रिकेतील अनावश्यक मुद्दे वगळून एकाच पानाचा अर्ज नमुना तयार करण्यात आला. शिधापत्रिकेसाठी एकूण पाच प्रकारचे नमुना अर्ज सादर करता येतात. यामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी कुटुंबप्रमुखाने भरावयाचा अर्ज, कौटुंबिक शिधापत्रिकेच्या युनिटमध्ये कायम वाढ करण्यासाठी अर्ज, कौटुंबिक शिधापत्रिकेतील युनिट्स कायम स्वरूपात कमी करण्याकरिता अर्ज, शिधापत्रिकेमध्ये पत्ता बदल किंवा अन्य फेरफार करण्याकरिता अर्ज आणि हरविलेल्या, चोरीस गेलेल्या, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या शिधापत्रिकेच्या बाबतीत दुसरी प्रत मिळण्याकरिता अर्ज, अशा पाच प्रकारच्या अर्जांचा समावेश आहे. शासनाच्या सुधारित अर्ज नमुन्यानुसार वाशिम जिल्हय़ात यापुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. या माहितीचा राहील समावेश!नवीन अर्जाची किंमत केवळ दोन रुपये अशी असून, यामध्ये एका पानावरच माहिती भरावी लागणार आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय, नागरिकत्व, पूर्ण निवासी पत्ता, कुटुंबातील सदस्य संख्या व प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आणि भरला जाणार एकूण व्यवसाय कर, आयकर किंवा विक्रीकर (विक्रीकर क्रमांक) या महत्त्वपूर्ण माहितीसह शिधापत्रिकेवर अन्नधान्न मिळविण्याचा हक्क स्वेच्छेने सोडू इच्छिता काय, अशा मोजक्याच माहितीचा समावेश नवीन अर्ज नमुन्यात राहणार आहे.