शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास मोठी किंमत मोजावी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

वाशिम : विद्युत देयक चुकविण्यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न संबंधित ग्राहकाला चांगलाच महागात पडणार आहे. वीज मीटरमध्ये फेरफार ...

वाशिम : विद्युत देयक चुकविण्यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न संबंधित ग्राहकाला चांगलाच महागात पडणार आहे. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच वेळप्रसंगी फौजदारी कारवाईलादेखील सामोरे जावे लागणार आहे.

वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही जण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात. परंतु ही वीज चोरी उघड झाल्यास संबंधित ग्राहकाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. महावितरणकडून मुंबईवगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जातात. मीटर रिडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक चक्क मीटरमध्येच फेरफार करतात. वीजचोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीज चोरी करणाऱ्याविरूद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.

०००००००००००

मीटरजप्ती अन् वापरापेक्षा दुप्पट दंड

वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चोरी पकडली गेल्यास वीज वापरापेक्षा दुप्पट रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो.

तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा बहाल केला जाऊ शकतो. तथापि, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर मीटर जप्त करून वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्याची कारवाई केली जाते. वेळप्रसंगी फौजदारी कारवाईही होऊ शकते.

००००

कधीही होऊ शकते मीटरची तपासणी

विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणची पथके सदैव दक्ष असतात. भरारी पथकही कारवाई करते. भरारी पथकाने सन २०१८-१९ मध्ये १७०, २०१९-२० मध्ये १४०, २०२०-२१ मध्ये ७७ आणि एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ४३ प्रकरणांत दंडात्मक कारवाई केली. याशिवाय महावितरणच्या अन्य स्थानिक पथकांनीदेखील वीजचोरीप्रकरणी कारवाया केल्या आहेत.

एखाद्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कुणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.

००००००००००००००००००००

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरूद्ध कारवाई

२०१८-१९ १७०

२०१९-२० १४०

२०२०-२१ ७७

००००००००००००००

कोट

वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मीटरमध्ये फेरफार होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून तपासणी केली जाते. मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यास अशा ग्राहकांविरूद्ध दंडात्मक तसेच वेळप्रसंगी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी वीज मीटरमध्ये कुणीही छेडछाड करू नये.

- सतीश मोरे,

अतिरिक्त कार्यकारी अभियंता

भरारी पथक, वाशिम.

००००००००००