शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत ३१ हजार शेतकऱ्यांची तूर मोजण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 17:56 IST

वाशिम: शासनाकडून देण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदतवाढ येत्या १५ मे रोजी संपत असून, वाशिम जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यां ची तूर मोजणे बाकी आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस खरेदी बंद असल्याने उर्वरित दोन दिवसांत ही तूर मोजून घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे झाले आहे.  वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ६ ...

ठळक मुद्दे६ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते.१० मे पर्यंत वाशिम जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर मिळून ९८३५ शेतकऱ्यांची १ लाख ३५ हजार ४६० क्विंटल तुरीचीच मोजणी होऊ शकली. अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर मोजण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे.

वाशिम: शासनाकडून देण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदतवाढ येत्या १५ मे रोजी संपत असून, वाशिम जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यां ची तूर मोजणे बाकी आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस खरेदी बंद असल्याने उर्वरित दोन दिवसांत ही तूर मोजून घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे झाले आहे.  वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ६ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. या ठिकाणी तूर विक्रीसाठी ४१०५८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यातील चार केंद्रांवर फे ब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तूर खरेदी सुरू झाली तरी, मालेगाव आणि मानोरा येथे तूर खरेदीला सुरुवात होण्यास विलंब लागला. त्यातच ठरलेल्या मुदतीत आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील इतरही जिल्ह्यात हीच स्थिती असल्याने शासनाने खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. तथापि, १० मे पर्यंत वाशिम जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर मिळून ९८३५ शेतकऱ्यांची १ लाख ३५ हजार ४६० क्विंटल तुरीचीच मोजणी होऊ शकली. अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर मोजण्याचे आवाहन प्रशासनापुढे असून, ही तूर येत्या दोनच दिवसांत मोजून घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम