वाशिम : "आत्मा" यंत्रणेमार्फत येथे २८ ते ३0 मे या कालावधीत तीन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. गरजू ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.२८ मे रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धान्य महोत्सवाचे उद्घाटन होईल. शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला गहू, ज्वारी, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रिय फळे, भाजीपाला विक्रीसाठी या उपलब्ध असणार आहे.हा माल ग्राहकांना शेतकर्यांकडून थेट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य दरामध्ये स्वच्छ, भेसळविरहित शेतमाल खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला बचतगट यांनी स्वत: विक्रीयोग्य चांगल्या प्रतीचा शेतमाल, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करावे. याबाबत अधिक माहितीसाठी ह्यआत्माह्ण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
वाशिम येथे २८ मे पासून तीन दिवस धान्य महोत्सव
By admin | Updated: May 9, 2017 02:09 IST