शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:55 IST

वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. १० डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, भुजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. कडु, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे विवेक राजुरकर आणि अभिजित दुधाटे यांची उपस्थिती होती.मीना यांनी गावातील साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध यंत्रणांची बैठक घेत योग्य त्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअर ईत्यादी सार्वजनिक स्त्रोतांची जैविक व रासायनिक पाणी नमुणे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ग्राम पंचायतचे ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी तसेच तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बौठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या कामात विलंब झाल्यास व लोकांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा ईशारा मीना यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद