शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकालदर्शक अभिलेख मुल्यांकनात वाशिमचे ‘सीईओ’ प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:20 IST

वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक असून, पाचव्या क्रमांकावर अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या चालू आर्थिक वर्षातील जुलै २०१८ पर्यंतचे प्रशासकीय कामकाज तसेच योजनांच्या उद्दिष्टपूर्तीचे मुल्यांकन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्याकडून करण्यात आले. यासाठी जुलै २०१८ च्या निकालदर्शक अभिलेखाचा (आरएफडी) आधार घेतला असून, यामध्ये वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक असून, पाचव्या क्रमांकावर अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुल्यमापनाकरीता गुगल ड्राईव्हवर स्प्रेडशीट तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील विविध योजनांचे एकूण उद्दिष्ट व आतापर्यंतचे साध्य याविषयी अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील जुलैपर्यंत जिल्हा व तालुका स्तरावर आॅनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे विभागीय आयुक्तांनी २३ आॅगस्ट रोजी गुणानुक्रम जाहीर केले असून, २४ आॅगस्टला मुख्य कार्यकारी अधिकाºयांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा गुणानुक्रम प्रथम असून, त्यांना १०० पैकी ४७.४२ अशी टक्केवारी देण्यात आली. त्याखालोखाल बुलडाणा मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा दुसरा क्रमांक असून, त्यांची टक्केवारी ४४.९९, अमरावती मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा तिसरा क्रमांक असून त्यांची टक्केवारी ४३.४०, यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा चवथा क्रमांक असून, त्यांची टक्केवारी ३८.१७ तर सर्वात शेवटचा क्रमांक अकोला मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा असून, त्यांची टक्केवारी ३४.१८ अशी आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद