शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

केंद्रीय विद्यालयाच्या इमारत बांधकामास मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:43 IST

निविदा प्रक्रियेस होणारा विलंब व जागेच्या भूमिपुजनाबाबत असलेल्या राजकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाने राज्यातील वाशिम आणि परभणी या दोन जिल्ह्यांना वर्षभरापूर्वी केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची मंजूरी दिली. त्यानुसार, वाशिममध्ये विद्यालयासाठी लागणारी जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली; तर शासनाकडून १२ कोटींचा निधी देखील मंजूर झाला. असे असताना निविदा प्रक्रियेस होणारा विलंब व जागेच्या भूमिपुजनाबाबत असलेल्या राजकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे.शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण अनुभवणाऱ्या वाशिम जिल्ह्यात २०१८ मध्ये ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमाचे धडे देणारे केंद्रीय विद्यालय मंजूर झाले. असे असले तरी विद्यालयासाठी लागणारी प्रशस्त इमारत उभी व्हायला किमान ३ वर्षे लागणार असल्याने हे विद्यालय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जागेतील इमारतीत सुरू करण्यात आले; मात्र ही इमारत अगदीच तोकडी पडत असून वर्गखोल्या सिमीत असल्याने इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचेच शिक्षण सद्या दिले जात आहे. पुरेशा जागेअभावी प्रत्येक वर्गाची एकच तुकडी (४० विद्यार्थी क्षमता) कार्यान्वित करण्यात आली असून पाल्ल्यांच्या भवितव्याची चिंता असलेल्या असंख्य पालकांना या विद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनाने सक्रीय कार्याची प्रचिती देत वाशिमला विद्यालय मंजूर होताच पुढील काही महिन्यातच वाशिम-चिखली रस्त्यावर विद्यालयाकरिता प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. शासनानेही त्यासाठी पहिल्या हप्त्याचा १२ कोटींचा निधी मंजूर केला; मात्र निविदा प्रक्रियेस होणारा विलंब आणि जागेच्या भुमिपूजनासंबंधी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्र्यांनी बाळगलेल्या उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. राज्यातील परभणीत तर अद्यापपर्यंत विद्यालय सुरू करण्यासाठीच जागा मिळाली नसल्याची माहिती आहे. यावरून शिक्षणाच्या बाबतीत शासन खरेच गंभीर आहे का, असा सवाल सर्वच स्तरातून उपस्थित केला जात आहे.वाशिममधील केंद्रीय विद्यालयासाठी लागणारी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे; मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने इमारतीचे काम सुरू झालेले नाही. यासंदर्भात सलग पाठपुरावा सुरू असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालय