शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 प्रशासक पदावर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:40 IST

सर्वाधिक ५३ ठिकाणी मुख्याध्यापक तर ४७ ठिकाणी केंद्र प्रमुख हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळणार आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्टमध्ये पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांच्या यादीवर नजर टाकली तर १६३ पैकी तब्बल १०० ग्रामपंचायतींमध्ये केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची प्रशासक म्हणून वर्णी लागल्याने, या यादीवर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा दिसून येतो.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. गावपातळीवर ग्राम पंचायतच्या निवडणुकीला विशेष महत्व असते. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक हे सर्व शक्ती पणाला लावून उतरत असतात. यंदा कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न तुर्तास भंगले आहे. प्रशासक म्हणून सरकारी कर्मचाºयांची नियुक्ती करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक म्हणून गटशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक ५३ ठिकाणी मुख्याध्यापक तर ४७ ठिकाणी केंद्र प्रमुख हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळणार आहेत. काही केंद्र प्रमुखांना तर प्रशासक म्हणून स्वत:चे गावही मिळाले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत