शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

बालगोपालांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या छोट्या लाकडाच्या नंदींचा. राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी १८०६ मध्ये ही प्रथा सुरू ...

हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या छोट्या लाकडाच्या नंदींचा. राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी १८०६ मध्ये ही प्रथा सुरू केल्याचा इतिहास आहे. हा उत्सव इतिहासात वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या गावाने मोठ्या नंदींचा, चित्ररथांच्या मिरवणुकीसह तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा मागील १४४ वर्षांपासून जपली आहे. तान्हा पोळा हे वैदर्भीय संस्कृतीचे वेगळेपण आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आपल्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तोरणात उभा करून कृतज्ञता व्यक्त करतो. हे संस्कार लहान मुलांवर पडावे, या उद्देशाने सुरू झालेली प्रथा आज संपूर्ण विदर्भात मोठ्या आनंदाने साजरी केली जात आहे. लहान मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केल्या जाते. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. सध्या कोविडच्या पार्श्वभुमीवर या तान्हा पोळ्याचे मर्यादित स्वरूप पहायला मिळत आहे. अशा स्वरूपाचा तान्हा पोळा येथील बालाजी मंदिरासमोर भवानीपंत काळु यांच्या हस्ते पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी काटिवेश परिसरातील बालगोपाल योगेश रंगभाळ, चेतन रंगभाळ, उमेश कथले, गोपाल रंगभाळ, विजय रंगभाळ, दीपक गाडे, पवन गाडे, राहुल काटकर, श्रीकांत रंगभाळ, अभी जाधव, धर्मेश पटेल, प्रशांत रंगभाळ व श्रीरंग रंगभाळ यांची उपस्थिती होती.