शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

जातीपातीचे राजकारण आले रंगात

By admin | Updated: October 10, 2014 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोटजातही झाली प्रतिष्ठेची.

वाशिम - आघाडी आणि युतीमध्ये झालेल्या फाटाफुटीने, तीनही विधानसभा मतदारसंघात विजयाचे समीकरण बिघडविले आहे. परिणामी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीपातीचे भावनिक आवाहन करून पोटजातीच्या मुद्यालाही हात घातला जात असल्याने निवडणुकीचे चित्र अधिकच अस्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णचा नारा दिल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीन म तदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी २९ अपक्ष तर २८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर नशिब आजमावत आहेत. राज्यात सर्वत्र निवडणुकीचा माहौल रंगात आलेला असताना, वाशिम जिल्ह्यात कारंजाचा अपवाद वगळता उर्वरि त दोनही विधानसभा मतदारसंघातील गारवा अजूनही कायमच असल्याचे दिसून येते. कारंजात निवडणुकीच्या व्यासपीठावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. युती, आघाडी तुटल्यामुळे सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याचे दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर कोणत्याही एकाच जातीच्या उमेदवाराला मतदारांनी वारंवार कौल दिला नसल्याचे दिसून येते. २0१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला आहे; परंतु मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुणाकडेही ठोस मुद्दे नसल्याने शेवटी जाती-पातीच्या मुद्याभोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या होणार्‍या गुप्त बैठकांवरूनही तेच स्पष्ट होत आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत जाती-पोटजातीचा मुद्दा फारसा प्रतिष्ठेचा नव्हता; मात्र मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याचे राजकीय वतरुळातील चर्चेवरून दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघात मराठा समाजा तील सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, डॉ. सुधीर कव्हर, ज्योती गणेशपुरे , जैन समाजातील राजेंद्र पाटणी तर मुस्लिम समाजातील युसूफ पुंजानी हे प्रबळ उमेदवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पक्षाच्या एकगठ्ठा मतदानाबरोबरच जात आणि पोटजातीचे मतदानही पदरात पाडून घेण्यासाठी आता समाजाच्या गुप्त बैठकांचे सत्रही सुरू झाल्याचे राजकीय चर्चेतून समोर येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कमकुवत आणि प्रबळ उमेदवाराचा अंदाज आल्यानंतर नातेसंबंध, पोटजात व पक्ष बाजूला सारून जातीच्या प्रबळ उमेदवारालाच पसंती देण्यापर्यंतची फिल्डिंगही समाजाच्या या गुप्त बैठकांमधूनच लावली जात असल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे.प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याने पक्षाबरोबरच जात-पोटजात हा फॅक्टरही प्रतिष्ठेचा बनला असल्याचे दिसून येते. मराठा समाजाचे मतदान चार उमेदवारात विभागले जाण्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. नेमकी हीच बाब हेरून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याने निवडणुकीला जातीपातीचा रंग चढत असल्याने निकाल कसे लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.