लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील काही दिवसांपासून बंद असलेले नाफेडचे खरेदी केंद्र शासनाच्या आदेशानुसार सोमवारी सुरु करण्यात आले. पहिल्या दिवसात एक हजार क्ंिवटलचे वर नाफेडच्यावतीने तूर खरेदी करण्यात आली. नाफेडच्या तूर खरेदी निमित्त बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थंडपाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र शासनातर्फे ३१ मे २०१७ पर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंद करणे तसेच टोकन मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची एकच गर्दी होत आहे. टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर मोजणी सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. सोमवारी एक हजार क्ंिवटलच्यावर शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे ग्रेडर व गोदामाचे नियोजन केल्यानंतर ही तूर खरेदी सुरू करण्यात आली. तोपर्यंत शेतकऱ्यांनी बाजार समितीत नोंदणी केली होती. आताही शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरवातीला टोकन घेणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी आता कमी झाल्याचे चित्र बाजार समिती आवारात दिसून आले. प्रत्यक्ष मोजणीला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांची मोजणीसाठी गर्दी दिसून येते. स्थानिक बाजार समितीच्या वतीनेसुद्धा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मंडपाची तसेच थंडपाणी व चहापाणी सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे सोमवारी दिसून आले. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांना टोकन दिले जाणार आहे. टोकण मिळालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी केली जाणार आहे.
वाशिम नाफेड केंद्रावर एक हजार क्ंिवटल तुरीची खरेदी
By admin | Updated: May 16, 2017 01:39 IST