शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

‘स्माईल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST

वाशिम : कोरोना महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी एन. एस. एफ. डी. सी., ...

वाशिम : कोरोना महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी एन. एस. एफ. डी. सी., नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत वारसदाराला ‘स्माईल’ योजनेतून व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना लवकरच अमलात येणार आहे.

या योजनेत १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून, यामध्ये एस. एफ. एफ. डी. सी.चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेसाठी व्याजदर ६ टक्के असून, परतफेडीचा कालावधी ६ वर्षे आहे. सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. कुटुंब प्रमुखाच्या रेशन कार्डमध्ये सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावी.

मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मृत्यू प्रमाणपत्र महानगर पालिका किंवा नगर पालिकेने दिलेले असावे. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, नालंदा नगर येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी केले.

००

ही कागदपत्रे जोडणे आवश्यक

स्माईल योजनेतून व्यावसायिक कर्ज मिळण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड, तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, कोविड-१९मुळे मरण पावलेल्या व्यक्तिचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरावा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.