शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल

By दिनेश पठाडे | Updated: March 28, 2023 19:51 IST

अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत  नसल्याचे चित्र आहे.

वाशिम :

अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत  नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी(दि.२८) रोजी वाशिम रेल्वेस्थानकावर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फुकट्यांसह अनधिकृत विक्रेत्यांकडून २८ हजार ४२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाशिम विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रवीण पवार यांनी विशेष मोहीम राबविण्यासाठी तीन तिकिट निरीक्षकांची नियुक्ती केली. त्यांनी मंगळवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांची तपासणी केली.  अकोला-पूर्णा आणि पूर्णा ते अकोला पॅसेंजर, इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड-अम्ब अंदुरा एक्सप्रेस या गाड्यातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांची स्थानकावर उतरल्यानंतर तपासणी केली करण्यात आली. यामध्ये ७९ जण विनातिकिट प्रवास करीत असल्याचे आढळून आले त्यांच्याकडून नियमानुसार दंड आकारण्यात आला. विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून २५ हजार ४२० रुपये आणि ३ अनधिकृत विक्रेत्यांकडून ३ हजार असा एकूण २८ हजार ४२० रुपयांचा दंड एकाच दिवशी वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाणिज्य विभागप्रमुख प्रवीण पवार यांनी दिली. विशेष मोहिमेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक सुरेश इंगोले,  तिकीट निरीक्षक प्रवीण गोणे, मोहन, रेल्वे सुरक्षा बल सहायक पोलिस  निरीक्षक शुक्ला, कॉन्स्टेबल मनोज यांचा समावेश होता.महिनाभरात २२६० जणांवर कारवाईअकोला-पूर्णा मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी आढळून येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. मागील महिनाभरात २२६० जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास ७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.