शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:33 IST

वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २० गोदामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला असून, या अभियानांतर्गत अमरावती विभागात ५ गोदामांची उभारणी सुरू करण्यात आली आहे.केंद्र शासनाने १३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानंतर्गत (एसएमएसपी) ग्रामपांचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ), स्वयंसहाय्यता गट (एसएचजी), अन्नधान्य उत्पादक संघ (सीआयजी), सहकारी संस्था, राज्य शासनाची मान्यता असलेल्या व कृषीक्षेत्राशी संबंधीत असलेल्या उपक्रमांत कार्यरत असलेल्या संस्थांमार्फत ५०० मेट्रिक टन क्षमतेचे बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांची उभारणी करण्याचे शासनाने ठरविले होेते. शंभर टक्के केंद्र पुरस्कृत असलेल्या या अभियानांतर्गत राज्यासाठी ५० युनिटचे लक्षांक देण्यात आले होते. सदर योजनेअंतर्गत ग्रामपाचायत स्तरावर बियाणे प्रक्रिया व साठवणूक केंद्र उभारणीसाठी रक्कम ६० लाख रुपये किंवा प्रत्यक्ष उभारणीस येणाऱ्या खर्चापैकी कमी असलेले अर्थसहाय्य देय असून, केंद्र शासनाच्या २२ जानेवारी २०१८ च्या पत्राद्वारे ही योजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचनाही प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात ३ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयातील सुचनान्वये बीज प्रक्रिया केंद्र आणि बियाणे साठवणूक गोदामे उभारण्याबाबत कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या २९ प्रस्तावांपैैकी २० प्रस्तावांना २१ जानेवारी २०१९ च्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात अमरावती विभागातील ५ प्रस्तावांचा समावेश असून, यात अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक दोन, तर वाशिम जिल्ह्यातील एका गोदामाचा प्रस्ताव आहे. आता या गोदामांच्या बांधकामास संबंधित संस्थांनी सुरुवात केली आहे. 

बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या किनखेड येथील संंत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीला ५०० मेट्रिक टनचे गोदाम मंजूर झाले आहे. या गोदामाची प्रत्यक्ष उभारणी संबंधित संस्थेने सुरू केली आहे.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र