शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथील पंचायत समिती इमारतीच्या लोकार्पणाला मुर्हूत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:29 IST

मालेगाव: येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय ईमारतीचे काम पूर्ण होऊन या ईमारतीचे हस्तांतरण रितसरपणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आले आहे; परंतु या प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. दुसरीकडे लोकार्पणापूर्वीच या ईमारतीत काही प्रशासकीय कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.  मालेगावच्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा ...

ठळक मुद्दे हस्तांतरण प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. लोकार्पणापूर्वीच या ईमारतीत काही प्रशासकीय कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.  रोजगार हमी योजना, आरोग्य विभाग कक्षासह इतर काही कक्षाचे काम या ईमारतीत सुरू आहे.

मालेगाव: येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय ईमारतीचे काम पूर्ण होऊन या ईमारतीचे हस्तांतरण रितसरपणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आले आहे; परंतु या प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. दुसरीकडे लोकार्पणापूर्वीच या ईमारतीत काही प्रशासकीय कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.  

मालेगावच्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा ताबा वाशिम जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर अनेक महिने लोकार्पणाची कोणाची वाट पाहिली. अखेर महिनाभरापूर्वी मालेगाव पंचायत समितीच्या प्रशासनाने या इमारतीत काही प्रमाणात कामकाजाला सुरुवात केली आहे. रोजगार हमी योजना, आरोग्य विभाग कक्षासह इतर काही कक्षाचे काम या ईमारतीत सुरू आहे. विशेष म्हणजे एकिकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेला ‘मार्च एंडिंग’ आणि दोन आठवड्यात दाखल होेत असलेली  पंचायतराज समिती याचा धसका घेत कर्मचाºयांच्या सभा वर सभा घेण्याचा सपाटा या नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झाला आहे. उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो), मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या सभांचा सपाटा सुरू आहे.  त्यामुळे मालेगाव पंचायत समितीची ही नवी प्रशासकीय इमारत लोकार्पण पूर्वीच कार्यरत झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असताना केवळ लोकार्पणाचा सोपस्कार पार पाडण्यासाठी ईमारतीच्या मुुख्य प्रवेश घरांना कुलूप बंद ठेवण्यात आलेले आहे दुसरीकडे बहुतांश पदाधिकारी मात्र आपल्या नेत्यांच्या हाताने लोकार्पण करण्याकरिता जिद्द धरून बसलेले आहेत सभापती आणि उपसभापती कक्ष जुन्या इमारतीमध्ये कायम सुरू आहेत प्रशासनाचा काही कारभार जुन्या इमारतीमध्ये तर काही कारभार नव्या इमारतीमध्ये सुरू असल्याने जनतेची  या इमारतीतून त्या इमारतीमध्ये येरझारा घालताना दमछाक होत आह

टॅग्स :washimवाशिमpanchayat samitiपंचायत समिती