शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कवठा ते रिसोड या मार्गावरील पुल उखडला; वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 17:24 IST

Washim News : पूल उखडल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे.

वाशिम : संततधार पावसामुळे कवठा ते रिसोड या मार्गावरील पूल उखडल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. येत्या आठवड्यात दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी शुक्रवार, १८ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ते रिसोड या दरम्यान असलेल्या पुलाची एक बाजू पुर्णत: उखडली असल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. या ठिकाणावरून पायदळ व दुचाकीने वाहनाने ये-जा सुरू आहे; मात्र चारचाकी वाहन जात नसल्याने गैरसोय होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. रिसोड तालुक्यातील निमार्णाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच कवठा जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ते व पुलांची दुरूस्ती करणे अपेक्षीत आहे. कवठा ते रिसोड या दरम्यानच्या पुलाची तातडीने दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वप्नील सरनाईक यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडRainपाऊस