शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बोडखे यांना जमीन परत करण्याचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:58 IST

वाकद(वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून, सावकार पीडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली. 

ठळक मुद्दे वाकद येथील प्रकरण पाच वर्षांनंतर मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कवाकद(वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून, सावकार पीडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाकद येथील आश्रू बोेडखे यांची सर्व्हे नं. २९५ मध्ये ०.८५ हे.आर. जमीन आहे. तथापि, एकलासपूर येथील जगन गंगा भारती यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ५६ हजार रुपये रकमेतून सदर जमिनीची खरेदी करून देण्यात आली होती. सदर रक्कम व्याजासह परत देण्यासाठी वाकद येथील सदाशिव सखाराम पोपळघट यांच्याकडून बोडखे यांनी सन २०११ मध्ये ४ टक्के व्याजदराने २ लाख १८ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात सदर जमिनीची खरेदी जगन भारती यांच्याकडून वनमाला सदाशिव पोपळघट यांच्या नावे करण्यात आली. दरम्यान, पोपळघट यांचे पैसे परत करून जमीन नावावर करून देण्याची मागणी केली असता, पोपळघट यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आश्रू बोडखे यांचा मुलगा संतोष बोडखे याने आपली जमीन परत मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक, अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथेही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१५ ला ही याचिका निकाली काढली व याबाबतची नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयास निर्गमीत करण्यात आली. त्यावरून सदर व्यवहार हा अवैध सावकारी स्वरुपाचा असल्याचे सिद्ध झाल्याने सावकारी अधिनियम कलम १८ (२) अन्वये सदर खरेदी अवैध ठरविण्यात आली व कर्जदार आश्रू किसन बोडखे यांना जमीन परत करण्याचे आदेश जिल्हा निबंधक यांनी दिले. 

टॅग्स :washimवाशिम