शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधावर बीजेएसच्या अध्यक्षांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST

महाराष्ट्र शासन व बीजेएसदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम्‌-सुफलाम्‌ अभियान वाशिम अंतर्गत बीजेएसमार्फत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या ...

महाराष्ट्र शासन व बीजेएसदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम्‌-सुफलाम्‌ अभियान वाशिम अंतर्गत बीजेएसमार्फत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. या कामांचे नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात १० फेब्रुवारी रोजी आढावा बैठकही पार पडली. यात बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथाही उपस्थित होते. त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कामांबाबत चर्चा करण्यासाठी बाळखेडा येथे प्रत्यक्ष भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, बीजेएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल फणसे, सपना सिंग, नंदकिशोर लोंढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील मृद संधारण विभागाचे तंत्र अधिकारी सुहास भगत, बीजेएस जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर तसेच शेतकरी विलासराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मुथा यांनी बालखेडाच्या शेतकऱ्यांशी सुमारे दोन तास चर्चा करीत संवाद साधला. सुजलाम्‌ सुफलाम्‌ योजनेंतर्गत बीजेएसने जेसीबी मशीन व पोकलेनद्वारे रिसोड तालुका तसेच बालखेडा व परिसरातील गावात केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी बालखेडा येथे व परिसरात बीजेएसने नाला खोलीकरण रुंदीकरण करून येथील शेतकऱ्यांना बारमाही शेती व फळबाग शेती करण्याची संधी मिळाली आणि उत्पादन वाढल्याची कबुलीच शेतकऱ्यांनी मुथा यांना दिली.