शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य पावले उचलले नसल्याचा आरोप करीत ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत ...

वाशिम : राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य पावले उचलले नसल्याचा आरोप करीत ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने १५ सप्टेंबर रोजी वाशिमसह जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.

महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबीसी आंदोलन कायम राहावे यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही प्रक्रिया ठप्प पाडली. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही, ओबीसी समाजाची संख्या निर्धारित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन केला; परंतु आयोगाला निधी दिला नाही, कर्मचारी दिले नाहीत. राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला, आदी आरोप करीत याविरोधात भारतीय जनता पार्टीने एल्गार पुकारला. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरांवर जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन केले. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात तब्बल तासभर रस्ता रोखून भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. यावेळी राजू पाटील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे व शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, अंबादास कालापाड, रामप्रसाद सरनाईक, अनिल ताजणे, शरद चव्हाण, नागोराव वाघ, धनंजय हेंद्रे, धनंजय रणखांब, धनाजी सारस्कर, गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, सुनील चौधरी, डिगांबर खोरणे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना खोरणे, अंजली पाठक, भावना सरनाईक, करुणाताई कल्ले, नीतेश मलिक यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

०००००

घोषणाबाजीने पुसद नाका दणाणला

वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक प्रभावित झाली होती. यावेळी आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.