शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:52 IST

वाशिम: ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते  १४ ऑक्टोबरदरम्यान वाशिम जिल्हय़ात जनजागृतीपर सप्ताह  राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी  बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली.

ठळक मुद्देसप्ताहाचा समारोप शाळा-अंगणवाडीत विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते  १४ ऑक्टोबरदरम्यान वाशिम जिल्हय़ात जनजागृतीपर सप्ताह  राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी  बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली.‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात व्यापक जनजागृती  करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी  अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस,  महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी  अधिकारी दिलीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात ९ ते १४ ऑ क्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. १0 ऑ क्टोबरला प्रभातफेरी, ११ ऑक्टोबरला मुलीच्या जन्माचे स्वागत  व पालकांचे अभिनंदन, मुलींच्या नावे वृक्षारोपण, १३ ऑ क्टोबरला आरोग्य व पोषण यासंदर्भात जनजागृती, विविध  माध्यमातून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यात आला.  १४ ऑक्टोबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या सप्ताहाचा समारो प करण्यात आला. प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात  बेटी बचाओ-बेटी पढाओची प्रतिज्ञा घेण्यात आली. वाशिम ये थील जिल्हा परिषदेच्या सभागृहात अंगणवाडी सेविका, मद तनीस यांनी प्रतिज्ञा घेतली तर शाळा, अंगणवाडीत विद्यार्थ्यांना  माहिती देण्यात आली. उमरा कापसे, पिंपळगाव, सापळी,  सावरगाव, उकळीपेन, टो यासह ग्रामीण भागात ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वाशिमचे  बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, अभियानाचे  जिल्हा समन्वयक रूपेश निमके, विस्तार अधिकारी तुषार  जाधव यांच्यासह जिल्हय़ातील सर्व बालविकास प्रकल्प  अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जि.प. शाळेचे  शिक्षक आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.