लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुनर्वसित गावांच्या विकासाकरिता जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला असून, शासनाकडून प्राप्त २.२५ कोटी रुपयांच्या निधीतून ४६६ कुटुंबीयांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. प्राप्त निधीतून गावठाण अंतर्गत विद्युतीकरण, विहिरीचे बांधकाम व इतरही अनेक कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्राखाली गेले असून, या गावातील ४९ कुटुंब बाधित झाली. तसेच बिबखेड हे गाव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली असून, गावातील २४८ कुटुंब बाधित झाली आहेत. दोन्ही गावांमध्ये वाढीव खर्चाच्या कामांसाठी १.१४ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून पळसखेड, बिबखेड येथे सुविधा पुरविल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्त ४६६ कुटुंबांना सुविधांचा लाभ
By admin | Updated: June 16, 2017 01:50 IST