शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

श्रद्धाला करायचेय काही तरी हटके

By admin | Updated: November 5, 2016 02:09 IST

शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे प्रस्थ निर्माण केले आहे.

प्राजक्ता चिटणीसमुंबई- शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे प्रस्थ निर्माण केले आहे. आता ‘रॉक आॅन 2’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. एवढेच नव्हे, तर या चित्रपटातील काही गाणीदेखील तिने गायली आहेत. या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...‘रॉक आॅन’ या चित्रपटाची तू फॅन असल्याने चित्रपटाच्या सिक्वलमध्ये तुला घेण्यात यावे, असे तुला वाटत होते. त्यामुळे तू स्वत: निर्मात्यांना संपर्क साधला, असे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?मी ‘रॉक आॅन’ हा चित्रपट माझ्या कुटुंबीयांसोबत पाहिला होता. त्या वेळीच मला हा चित्रपट इतका आवडला होता, की या चित्रपटाचा सिक्वल आला, तर मला या चित्रपटात काम करायचे आहे, असे मी तेव्हाच सगळ्यांना सांगितले होते. या चित्रपटाच्या सिक्वलची ज्या वेळी चर्चा सुरू झाली, तेव्हा मी स्वत:हून निर्मात्यांना फोन करून मला या चित्रपटाबाबत तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यावर या चित्रपटातील मी साकारत असलेली व्यक्तिरेखा जी कोणी अभिनेत्री साकारेल त्या अभिनेत्री त्या चित्रपटातील तिची गाणीदेखील गावी, असे आधीच ठरले असल्याने मी अभिनयासोबत या चित्रपटात गायन करावे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी यशराज स्टुडिओत जाऊन गाणी गायली आणि अशाप्रकारे मी या चित्रपटाचा भाग बनले.तुला गाण्याची केवळ आवड आहे की तू गाणे शिकलेदेखील आहेस?माझे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते. मी लहानपणी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच मी काही वेळा आईसोबतही गात असे. मला गाताना एक वेगळाच आनंद मिळतो. मन एकदम शांत झाल्यासारखे वाटते. त्यामुळे गाणे ही गोष्ट मला मनापासून आवडते. माझ्या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळत आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. तू रियाजासाठी वेळ कसा काढतेस?सध्या तरी मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने मला रियाजासाठी वेळ मिळत नाही. पण, तरीही मी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. मी आठवड्यातील काही दिवस तरी व्हॉइज एक्सरसाइज करते. ‘रॉक आॅन’ चित्रपटातील गाणी गायच्या आधी मी सॅमन्था अ‍ॅडव्हडर््स यांच्याकडून व्हॉइज ट्रेनिंग घेतली होती. कारण पाश्चिमात्य संगीत कधी मी शिकले नसल्याने या चित्रपटातील गाणी गाणे माझ्यासाठी अवघड होते. पण, ही गाणी रेकॉर्ड करताना मी खूप एन्जॉय केले. तुला अभिनेत्रीच बनायचे आहे, असे तू कधी ठरवलेस?मला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. माझ्या वडिलांचे शोचे अतिशय रंगीबेरंगी कोट घरात असायचे ते मी घालून आरशासमोर अभिनय करायचे, नाचायचे. या सगळ्यामुळे मी चित्रपटसृष्टीतच करिअर करणार, याची माझ्या कुटुंबीयांना चांगलीच कल्पना होती. चित्रपट निवडताना वडिलांकडून काही सल्ला घेतेस का?माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट आली, की ती अनेक वेळा माझे वडीलदेखील वाचतात. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असल्याने मला त्यातील छोट्या-छोट्या गोष्टीदेखील समजवून सांगतात. ते मला सल्ला नक्कीच देतात. पण मी निर्णय काय घ्यावा, हे मी स्वत:च ठरवावे, असे त्यांचे म्हणणे असते. तुझे वडील एक प्रसिद्ध कॉमेडीयन आहेत, तू कधी कॉमेडी करायचा विचार नाही केलास का?माझ्या वडिलांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला गोगो, राजा बाबू, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखा मला खूप आवडतात. त्यांच्याप्रमाणे कॉमेडी करायला मला नक्कीच आवडेल. एखादी चांगली पटकथा आल्यास प्रेक्षकांना माझे एक वेगळे रूपदेखील पाहायला मिळेल.