शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:34 IST

- संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ ...

- संतोष वानखडेवाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ मध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्चपूर्वी पीककर्जाची वसुली व्हावी यासाठी बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सन २०१९ च्या खरीप हंगामात पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी मार्च २०२० पर्यंत पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात ‘लॉक डाऊन’ची स्थिती आहे. यामुळे शेतमालाची विक्री करणे यासह शेतकºयांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू असताना आणि लॉक डाऊनची स्थिती असतानाही बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा, असा तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला नाही तर शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. दरम्यान शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसू नये म्हणून आमदार अमित झनक यांनी २४ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकºयांची भीषण परिस्थिती विषद केली. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे संकट आणि संचारबंदीमुळे शेतकºयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी पीककर्जाचा भरणा करण्यासाठी असमर्थ असल्याने विविध बँकांचे कर्ज भरण्यास शेतकºयांना एका महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार झनक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांनी ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला तर व्याज आकारले जाणार नाही, असे शासनाचे निर्देश आहे. पीककर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्रव्यवहार नाही. आम्ही पीककर्जासाठी शेतकºयांकडे तगादा लावत नाही.- व्ही.बी. महाले, बँक निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाशिम

टॅग्स :washimवाशिमbankबँकCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी