शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत लोकवाहिनी ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:51 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)  कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित  मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल जिल्ह्यात एसटी कर्मचार्‍यांचा बंद शंभर टक्के यशस्वी!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)  कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित  मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उ पसण्यात आले. वाशिम जिल्ह्यात या संपाला शंभर टक्के यश  मिळाले असून, प्रशासन आणि कामगारांचा संघर्ष दिवाळीत  उफाळून आल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी मान्य ताप्राप्त संघटनेने हा संप पुकारला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आयोग लागू  करण्याबाबत त्यांनी असर्मथता दर्शविली. परिणामी, मान्यताप्राप्त  संघटनेने संप करण्याचा निर्णय घेतला. एसटी कामगारांनी  राज्यभर संपाची हाक दिल्यानंतर संपाच्या तडजोडीबाबत मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मान्यताप्राप्त संघटनेच्या  शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी  महामंडळातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू  करण्यास असर्मथता दर्शवली. त्यामुळे मध्यरात्रीपासून राज्यभर  एसटी कामगारांचा संप सुरू झाला आहे. मान्यताप्राप्त कामगार  संघटना आणि इंटक या दोन्ही प्रमुख संघटना संपात सहभागी  झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील ७00 हून अधिक कर्मचारी  या संपात सहभागी झाले असून, या संपामुळे एसटीच्या प्रवासाला  पसंती देणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेतच शिवाय दिवाळीच्या  उत्सवात प्रवास करणार्‍या प्रवाशांना अतोनात त्रास सहन करीत  खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांची  गैरसोय होऊ नये यासाठी सर्व   खासगी प्रवासी बस, स्कूल  बस, कंपन्यांच्या मालकी बस आणि मालवाहू वाहने यांना  प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता दिली असली तरी, वाशिम  जिल्ह्यात अशा वाहनांचे प्रमाण कमी असल्याने विशेष करून  ग्रामीण भागांतून प्रवास करणार्‍या लोकांना यामुळे मोठा त्रास  सहन करावा लागत आहे. रिसोड आगारात एकूण २६५ कर्मचारी असून यापैकी २0७  कर्मचारी संपावर असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली.  कारंजा आगारात २५९ पैकी १५२, वाशिम आगारात ३२५ पैकी  २१९, मंगरुळपीर आगारात २६४ पैकी २१0 कर्मचारी संपावर  असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील एकूण  १११३ पैकी ७८८ कर्मचारी संपावर आहेत.

खासगी वाहनधारंकांची मनमानी..एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गोची झाली  आहे. या संधीचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून  घेण्यात येत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आधार घेऊन  त्यांनी मनमानी पद्धतीने प्रवासभाडे आकारण्यास सुरुवात केली  आहे. एसटी प्रवास भाड्यापेक्षाही अधिक प्रवासभाडे या  वाहनधारकांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत  आहे. दरम्यान, काही खासगी वाहनधारक मात्र माणुसकीचा प्र त्यय देऊन प्रवाशांची सेवा करण्यालाही प्राधान्य देत आहेत. 

कामावर विनाशर्त परतण्याची सूचना..मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्यावतीने पुकारलेल्या सं पामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या पृष्ठभूमीवर  परिवहन महामंडळाच्या सुचनेनुसार विभागीय वाहतूक  नियंत्रकांसह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने जिल्ह्यातील  प्रत्येक आगारांमध्ये संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांना मंगळवार १७  ऑक्टोबर रोजीच्या ५ वाजेपर्यंत कामावर परतण्याची सूचना  देणारी नोटीस लावण्यात आली होती. या सुचनेचे पालन न  करणार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे  नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आमची इच्छा नसताना आम्हाला हा संप करावा लागत आहे.  आमच्या मागण्यांबाबत तडजोड करण्याऐवजी पाच वर्षेच काय  पुढील २५ वर्षे तुम्हाला वेतन आयोग लागू होणार नाही, असे  वक्तव्य परिवहन मंत्र्यांकडून झाल्यामुळे कर्मचारी निराश झाले  आहेत. सातवा वेतन आयोग महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांना लागू  झाल्यानंतर तो एसटीच्या कर्मचार्‍यांनाही शासकीय कर्मचारी  म्हणून लागू करावा, अशी आमची मागणी आहे. -अविनाश जहागिरदार प्रादेशिक सचिव, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना अकोला.-

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ