शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात बळीराजा चेतना अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:46 IST

वाशिम :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती,  राष्टÑीय सेवा योजनातर्फे वाशिम जिल्हयात विविध ठिकाणी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रम राबविणे सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती,  राष्टÑीय सेवा योजनातर्फे वाशिम जिल्हयात विविध ठिकाणी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रम राबविणे सुरु आहे. या अभियानाचे उदघाटन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम येथे करुन या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय चौधरी होते. प्रमुख मार्गदर्शन म्हणून राजाभाऊ इंगळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. शुभांगी दामले  यांनी केले. विद्यापिठाने बळीराजा चेतना अभियान का राबविले याची विस्तृत माहिती दिली. या अभियानातून शेतकरी आत्महत्यापासून परावृत्त करणे, त्यांचे मनोबल वाढविणे, शेती सोबतच जोडधंदा करुन त्याची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा असल्याचे प्रा. शुभांगी दामले यांनी प्रास्ताविकातून सांगितले.  प्रमुख मार्गदर्शक राजाभाऊ इंगळे यांनी  सेंंद्रिय शेतीची गरज यावर मार्गदर्शन केले. सर्व रोगांचे मूळ कारण विषयुक्त फवारणी हे आहे. म्हणून सेंद्रीय शेतीला प्राधान्य दयावे, तसेच नापिकीचे कारणही विषयुक्त फवारणीच  आहे े सांगितले.  शेतकºयांचे आर्थीक स्तोत्र मुख्य शेतीेच. उत्पन्न झाले नाही म्हणून शेतकºयांवर आत्महत्येची पाळी येते, हे टाळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासचा सल्ला दिला. या विषयावर विद्यार्थ्यांचा संवाद राजाभाऊ इंगळे यांच्या सोबत घडून आला.  शेतकºयांच्या शंकाचे समाधानही करण्यात आले.  यावेळी बंडु इढोळे, लक्ष्मण बयस या शेतकरी प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. तसेच पर्यटनासाठी शेती हा नविन विषयाचे मार्गदर्शन प्रा. प्रगत पडघान यांनी केले. समृध्द शेतकरी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग शेतकºयांनी केले पाहिजे. ज्यातून शेतीसोबत दुसºया पार्यायही आर्थीक बाजू वाढविण्यासाठी पुरक ठरु शकतो त्यासाठी येथील शेती  पर्यटन चांगला पर्याय ठरु शकतो . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय चौधरी यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात आपण सर्व शेतकºयांची मुल आहोत आणि मुलींनी सुध्दा आता प्रगत शेती आणि आधुनिक शेती व्यवसायाकडे बघावे. नर्सरी सारख्या व्यवसायाकडे लक्ष देवून शिकसोबत आर्थीक मिळकत करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश राठोड यांनी व आभार प्रा.अनिल खाडे यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिम