५ जून ते २७ जून याकाळात १६,५०० हजार नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले . या लसीकरणासाठी शहरातील एकूण ६ केंद्रावर लस देण्यात आली .महाविद्यालयाच्या इंडोर हॉलमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण केले गेले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरणासाठीची कुपन वाटणे, नोंदणी करणे, नागरिकांना चहा पाणी औषधी इत्यादीसाठी हिरिरीने सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष उत्तमचंदजी बगडिया यांच्या मार्गदर्शनामध्ये प्राचार्य डॉ. विजय तुरुकमाने, रा. सो. यो. कार्यक्रम अधिकारी इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी अतोनात प्रयत्न केले. लसीकरणातील संपूर्ण ६ केंद्रावरील डॉक्टर्स ,नर्स व स्टाफ यांच्या जेवण नाश्ता व चहापाणी याची व्यवस्था .उत्तमचंदजी बगडिया यांनी केली होती. या कामासाठी त्यांना व्ही. जी. वसू व अमरदास परिवार यांचे सहकार्य लाभले.
समता फाउंडेशनच्या लसीकरणात बगडिया महाविद्यालयाचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST